Thursday, September 23, 2010

चारोळ्या (’तू’)

तुझ्यासमोर गळुन पडलेले शब्द
कवितेत मात्र चुरुचुरु बोलु लागतात
तुझ्यासमोर लपणा-या भावना
कवितेत मात्र ओसंडुन वाहु लागतात

तू दुरुन दिसतांच
मी शब्दांची जुळवाजुळव करायला लागते.
पण तू जवळ येतांच
शब्दांना निपचित पडलेलं बघते.

तू येतोस
आणि माझे चराचर पुलकित होते
तू जातोस
आणि ते उजाड माळरान होते

तुझ्या प्रेमामधे खंगणं
हे आता माझे व्यसन झाले आहे
खरंतर हि आता
स्वत:ला हवीहवीशी वाटणारीच गोष्ट झाली आहे

Varsha

3 comments:

Ajay Sonawane said...

sundar !

श्यामली said...

मस्तय ग ही चारोळी :)

तुला पाऊस कवितेचा खो देत्ये चल लिही पटापट आता

http://kavadasaa.blogspot.com/

Ameya Girolla said...

मस्त!!!

http://full2dilse.blogspot.com/