कोरोना तू ना एक कोडं आहेस
कुणाचा तुझ्या असण्यावर विश्वास आहे, कुणाचा नाही
कुणाला तुझी प्रचिती येते कुणाला नाही
कुणाला प्रचिती येऊन देखिल तुझे आस्तित्व मानायचे नाही
खरच, कोरोना तू ना एक कोडं आहेस
देवाची जशी 33 कोटी रुपे
तशी कोरोना म्यूटेट होऊन म्हणे तुझी देखिल अनंत रुपे ?
ईश्वर म्हणे चराचरात आहे
कोरोना, म्हणे तू देखिल चराचरात आहेस ?
साऱ्या विश्वाला तू हैराण केलेस
खरच, कोरोना तू ना एक कोडं आहेस
कुणी म्हणतं तू स्पर्शातून येतोस
कुणी म्हणतो तू हवेतून येतोस
कुणी म्हणतो तू ना एक नुसतीच पसरविलेली भिती आहेस
खरच, कोरोना तू ना एक कोडं आहेस
कुणी म्हणतो घरात थांबा, म्हणजे तू भेटणार नाहीस
कुणी म्हणतो बाहेर पडा, तुझ्यात काही जास्त दम नाही
कुणी म्हणतं तुझ्यावर काहीच औषध नाही,
कुणी म्हणतं आयुर्वेद, होमिओपथी ने तू पळतोस
खरच, कोरोना तू ना एक कोडं आहेस
कुणी म्हणतं तू लॅब मधे तयार झालास
कुणी म्हणतं तू वटवाघुळातून आलास
पहिले म्हणे मास्क घालू नका
आता म्हणे मास्क घाला
कुणी काय म्हणतं कुणी काय
साऱ्या विश्वाला तू वेडं केलं
खरच, कोरोना तू ना एक कोडं आहेस
आता शास्त्र देखिल अंधश्रद्धा आहे का
असं वाटायला लागलय
मंगळावर जाण्याच्या वल्गना करणाऱ्या माणसाला
एका साध्या विषाणुने होत्याचे नव्हते केले आहे
रोज एक कॉंस्पिरसी थेअरी येते
खरे काय खोटे काय समाजेनासे झाले आहे
खरच, कोरोना तू ना एक कोडं आहेस
तू दिसत नाहीस पण
तुझ्यामुळे अनेक लोकं मेली, अनेक घरे उध्वस्त झाली
पूर्ण विश्वाची उलथापालथ झाली
आता तू माणसाच्या मनात, संवेदनात अत्र तत्र सर्वत्र आहेस.
खरच, कोरोना तू ना एक कोडं आहेस
कुणी म्हणतं बरं झालं कोरोना तू आलास
ह्या धकाधकीच्या आयुष्याला लगाम लागला
निसर्ग पुन्हा डोलायला लागला
माणसाच्या उन्मादाला चांगलीच चपराक बसली
कोण आहेस कोण तू कोरोना ?
तू खरच आहेस का नाही आहेस ?
खरं काय आहे कोरोना ,
ते तुझ्याबद्दल फक्त तुलाच माहिती
आमच्यासाठी मात्र
खरच, कोरोना तू ना एक कोडं आहेस
Varsha Nair
Friday, July 03, 2020
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment