Tuesday, November 18, 2008

दु:ख

तू मिळाला नाहीस असं कुणाचच आयुष्य नाही
प्रत्येकाला तूला सामोरं जावंच लागतं.
तू तर एकच आहेस
तू प्रत्येकाच्या घरात, हृदयात रहातोस
पण प्रत्येकाच्या वेगळ्या रसायनात मिसळून
विभिन्न रुपे धारण करतोस.
तू प्रत्येकाच्याच रसायनात मिसळला आहेस.
काहिंना तू आपल्या रसायनात मिसळून गेल्यावर
ह्या रसायनाचीच नशा चढते, व कलेची निर्मिती होते.

प्रत्येकजण तुझं त्यांच्यातील आस्तित्व दाखविणं टाळतात.
पण तूच तर आहेस जो सच्चे मीत्र, सच्चा सखा मिळवून देतोस.
एखाद्या फसव्या अनाहुत क्षणी
जेव्हा दोन व्यक्तींना परस्परांतील तूझे दर्शन होते
तेव्हा त्या अधिक जवळ येतात.

तूझ्याशी दोस्ती करायची का वैर हे प्रत्येकाच्या रसायनावर अवलंबून असतं
पण चांगल्या माणसाच्या रसायनात
तू बहुधा दुध पाण्याच्या मिश्रणासारखा सहज मिसळतोस
आणि म्हणूनच तू चांगल्या माणसात अधिक आढळतोस.

तू आहेस म्हणूनच सुखाचे आनंदाचे महत्त्व
तू नसताच तर मग सुखाला सुख तरी कोणी म्हणाले असते का?
सुखाचे आणि हास्याचे नाते आहे
तूझे आणि अश्रूंचे नाते आहे
पण सुख आणि हास्य दोन्हिही फसवं व कृत्रिम असु शकतं
दु:ख आणि अश्रु मात्र सच्चे असतात.

तूच माणसाला जमिनीवर ठेवतोस,
आर्तता, उदासी ही पण तूझीच रुपे आहेत
प्रेमाला पण सुखापेक्षा तूच जवळचा वाटतोस
आणि मला देखिल.....

तुझ्या मुळेच मला माझ्या मनाच्या खोल डोहाचा तळ गाठता येतो
व माझ्या आत्म्याचे देखिल दर्शन होते.

5 comments:

akshay said...

ekdam chabukkkkkk

Innocent Warrior said...

नमस्ते वर्षा,
ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल खूप खूप आभार!!!
आपण खूप छान लिहिता !!!
मी आता या ब्लॉग ला आवर्जून भेट देईन !!!

आपला नम्र,
अभी

Varsha said...

अभी,
प्रतिसादाबद्दल धन्यवाद. तूमचा ब्लॊग मला मनापासुन आवडला. आणि ब्लॊगचे नाव तर अतिशय उत्तम आहे.

वर्षा

HAREKRISHNAJI said...

सुरेख.

Varsha said...

:)