Tuesday, September 25, 2012

प्रेम-बीम

तुला काय वाटतं मी तुझ्यावर प्रेम-बीम करते?
चल फ़ुट असं काही नाही
हा तर माझा एक विरंगुळा आहे.
तुझ्याविषय़ी विचार करणे, तुझ्याप्रेमामधे खंगणे हि सगळी ना माझी व्यसनं आहेत,
मनाला रिझविण्याची ती सगळी थेरं आहेत

तुला काय वाटतं मी तुझ्यावर प्रेम-बीम करते?
चल फ़ुट असं काही नाही
प्रेम म्हणजे नेमकी काय रे?
शेवटी सगळॆ स्वत:चीच कुठली तरी गरज भागविण्यासाठी असते सारे
तुला प्रेमपत्र लिहुन आनंद मला मिळतो, तुझ्यावर प्रेम करुन आनंद मला मिळतो,
तुझ्या विरहामधे व्याकुळ होउन, खोल खोल मनाची दरी मी गाठते
पण शेवटी ते मन माझच असतं ना, तो अनुभव माझाच असतो ना?

तुला काय वाटतं मी तुझ्यावर प्रेम-बीम करते?
चल फ़ुट असं काही नाही
तुझ्या भेटीनंतर माझ्या मनात शिल्लक राहीलेला तू मला बरेच काही देतो,
तो तुझ्यापेक्षा ब-याच वेळा वेगळा असतो
म्हणजे काय माझ्या मनातला तू शेवटी वेगळाच ना?
 तू तर फ़क्त एक निमित्त
शेवटी मीच, माझ्यासाठीच, माझ्या आत्म्यासाठीच
बाकी सारे शून्य

वर्षा २५.९.१२

11 comments:

Anonymous said...

sahi..!

Anonymous said...

sahi..!

Varsha said...

hey thanks a lot vishal

Unknown said...

hmmm.......Wonderful different thought!!

Jyoti Manohar said...

mast!!!!!!

Varsha said...

Thanks Patya, JM

K P said...

थोडी खट्याळ, थोडी औपरोधिक, अखेरीस अध्यात्माकडे झुकणआरी अशी लेखनकृती आवडली. तुमचे लेखन अध्यात्मिक लालित्याकडे झुकणारे आहे. मराठी ललित लेखनातील आघाडीचे शिलेदार रवींद्र पिंगे व यशवंत पाठक यांचे लेखन आपण कदाचित् वाचले असेल.नसेल तर अवश्य वाचावे. आपण नाटकलेखनही केले असावे, असे वाटते.
शुभेच्छा.

Varsha said...

Thanks a lot Kedar.
अगदी योग्य analysis केलंत. आणि सुंदर प्रतिक्रीया दिलीत.
मी स्वत: आपण उल्लेख केलेल्या व्यक्तींचे लिखाण वाचलेले नाही. पण आता जरुर वाचेन.
धन्यवाद पुन्हा एकदा.

K P said...

धन्यवाद.

तुमच्या या लेखनात नाट्यछटाही जाणवते म्हणून नाटकाचा उल्लेख केला. माझे अधूनमधून कथालेखन सुरु असते. तुम्ही कथा हा प्रकार हाताळला आहे का?

Unknown said...

तुला काय वाटत मी तिझ्यावर प्रेम बीम करतो..??
चल फुट.अस काही नाहीं.

मुलांचे डायलॅाग्स् 😊

Sandeep said...

realistic poem. this is truth.