Monday, March 14, 2011

सुनामी

पुन्हा पुन्हा तू येतोस
तुझा मीट्ट अंधार,
गडद काळोख घेउन
पुन्हा पुन्हा ते पाशवी,
ऋद्र, आक्राळ -विक्राळ विद्रुप क्षण होऊन
पुन्हा मी लढते, जीव तोडुन
सत्याची अखंड तेवणारी ज्योत घेऊन,
स्वत:तील सत्व जपत
तू घोंघावत येतोस सुनामी सारखा
आपल्या आक्राळ विक्राळ, विद्रुप विनाशकारी लाटेत
मला संपवून टाकायला
पण मी जिवाच्या आकांताने लढते
स्वत:च्या आत्म्यात तेवणा-या सत्याच्या ज्योतीच्या आधाराने
लढते लढते लढते
त्या आक्राळ विक्राळ विनाशकारी सुनामीला
पुन्हा एकदा परतवून लावते
माझा मेंदु पुन्हा थोडा मरतो
पण मी जिवंत रहाते
आणि पुन्हा मी त्या जिवनरुपी वेताळाला
खांद्यावर घेवुन पुढील प्रवासाला निघते

Varsha

No comments: