Wednesday, July 13, 2011

यादें

यादोंका एक अच्छा है
वोह कभी बुढी नही होती
यादें देनेवाले बुढे हो जाते है, बदल भी जाते है
लेकीन यादे हमेशा जवां रहती है!

मुझे यादों मे रहना
ही अच्छा लगता है
क्युंकी यादें हमेशा मेरी होती है
अत्तर कि तरह वह अपनी खुशबु
बरकरार रखती है!

वर्षा ... Varsha 05-Jul-11

Saturday, May 28, 2011

एक चित्र

एक होतं चित्र
आभासांच्या रंगात रंगविलेले
मुक्या भावनांना घेउन सजविलेले
स्वप्नांच्या गावाची सैर घडविणारे
ते होते एक अलौकीक चित्र

धुसर किनारे, अदृष्य लाटा
आणि आसमतांत भरलेले ते मधुर गीत
पण हे काय झालं, आभास विरले
आणि सत्याच्या रंगात मिसळुन गेले.
अदृष्य लाटांना आले सत्याच्या लाटेचे रंग
एव्हाना त्या सुंदर चित्राने कधी विद्रुप रुप धारण केले ते कळाले देखिल नाही.

वर्षा (Varsha 28-5-2011)
२८-५-११

Saturday, March 26, 2011

पिक्चर परफेक्ट

सगळं कसं पिक्चर परफेक्ट आहे त्यांचं
छान घर, घरात फर्निचर
फ़र्निचरवर एक फोटो फ़्रेम
फ्रेममधे एक पिक्चर परफेक्ट फोटो
फोटोत नवरा-बायको-मुले ह्यांचा हसरा चेहरा
सगळ कसं अगदी परिकथेतल्या सारखे पिक्चर परफेक्ट
पण....
त्याच पिक्चर परफेक्ट घरात अजुन पण कुणीतरी रहातं
किंबहुना त्याचं आस्तित्व घरभर आहे
प्रामुख्याने आहे
पण बसं फोटॊ काढतांना त्यांनी त्याला मात्र बोलविले नाही.
तो आला तर मग फोटो पिक्चर परफेक्ट येणार नाही ना
आणि मग संसार सुद्धा पिक्चर परफेक्ट दिसणार नाही.
शेवटी त्यांना ह्या जगाच्या शोकेस मधे उभे रहायचे आहे
आणि शोकेस मधे फक्त आकर्षक गोष्टींनाच स्थान असते

Varsha

Monday, March 14, 2011

सुनामी

पुन्हा पुन्हा तू येतोस
तुझा मीट्ट अंधार,
गडद काळोख घेउन
पुन्हा पुन्हा ते पाशवी,
ऋद्र, आक्राळ -विक्राळ विद्रुप क्षण होऊन
पुन्हा मी लढते, जीव तोडुन
सत्याची अखंड तेवणारी ज्योत घेऊन,
स्वत:तील सत्व जपत
तू घोंघावत येतोस सुनामी सारखा
आपल्या आक्राळ विक्राळ, विद्रुप विनाशकारी लाटेत
मला संपवून टाकायला
पण मी जिवाच्या आकांताने लढते
स्वत:च्या आत्म्यात तेवणा-या सत्याच्या ज्योतीच्या आधाराने
लढते लढते लढते
त्या आक्राळ विक्राळ विनाशकारी सुनामीला
पुन्हा एकदा परतवून लावते
माझा मेंदु पुन्हा थोडा मरतो
पण मी जिवंत रहाते
आणि पुन्हा मी त्या जिवनरुपी वेताळाला
खांद्यावर घेवुन पुढील प्रवासाला निघते

Varsha