Friday, October 03, 2008

सोहम

आता रोजच यावसं वाटतं तूझ्याकडे,
तसे तुझ्या माझ्यामधिल आस्तित्वाचा शोध मला माझ्या जन्मापसुनच लागला,
पण आता तुझ्या ओढीने मी खुपच व्याकुळ होते,
माझे अश्रु शिंपडल्याशिवाय तू तूझ्या नीद्रेतून जागा होत नाहिस
एरवी तुझे माझ्यातील आस्तित्व तू जरा देखिल जाणवु देत नाहिस्
तू अमुर्त आहेस, मुखवटे चढवायला तुझ्याकडे चेहरा, शरीर आहे कुठे
तू आहेस फक्त एक भावना माझ्याच मनात पैदा झालेली.
तुझे आस्तित्वच माझ्या आस्तित्वात आहे
पण तरिही वेडं मनं तूला माणसात शोधायला जाते
तुला शोधित शोधित मी मृगजळा मागें वेडयासारखी धावते
आणि धावून धावून थकले कि पुन्हा तुझ्याकडे येते
तू सवयीप्रमाणे पुन्हा मला तूझी शितल छाया आणि अथांग प्रेम देतोस
आणि म्हणतोस वेडे "तुझ्यातच आहे मी आणि तू मला शोधित इतकी धावलीस?"
खरंच, मी आहे मन.. अतृप्त, आसक्त, तृषार्त
आणि तू आहेस माझा आत्मा... अमुर्त, निराकार तरिही शाश्वत, सच्चा.
**********************************************************************************
वर्षा म्हसकर-नायर
nair.varsha@gmail.com

7 comments:

HAREKRISHNAJI said...

वा.

Varsha said...

thanks!!!

प्रशांत दा.रेडकर said...

वर्षा,
खुप छान लिहिले आहेस.
अभियंते खुप संवेदनशील असतात.[:)]

अभिप्राया बद्दल मनापासुन आभार.

विशाखा said...

Hi Varsha,

Chhan ahe tujhi kavita... kharach apan kiti diwas swatahchyach shodhat bhatakat rahto!

Varsha said...

Thanks vishakha!!! tu U.S. madhe kuthe asates?

akshay khot said...

chabuk ekdamm

संजू said...

हा शोध हेच आपल्या जगण्याचे प्रयोजन नाही का?
माउलींना आणि त्यांच्या सगळ्या भावंडांना पंचविशी च्या आत लागला हा शोध, आणि त्यांनी इहलोकीची यात्राच संपवली.
आणि त्यांना लवकर हा शोध लागला, कारण त्यांनी आपल्या सगळ्या चित्तवृत्ती त्याच्या ठायी एकवटल्या होत्या. आपल्याच्याने आत्ता तरी होणार नाही हे!
संसार आहेत ना आपले..........
पण त्याची ओढ लागली आहे, हे मात्र रत्नागिरीच्या अप्पाशास्त्री फडकेंच्या शब्दात सांगायचे तर, "वाट बरोबर धरली आहे. आता त्या वाटेनी मुक्कामापर्यंत कधी पोहोचवायचे, हे त्याच्याच हाती आहे.."